SHARE

चर्चगेट - लोकल मार्गावरील अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे पोलिसांतर्फे समुपदेशन, कारवाई, जनजागृती या त्रिसूत्रींच्या आधारे रेल्वे प्रवासी सुरक्षा सप्ताह हाती घेण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी चर्चगेट स्थानकात महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. तर जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चर्चगेट परिसरात जनजागृती रॅली काढली. सीएसटी रेल्वे प्रवासाबाबत अंजुमन हायस्कूलच्या अधिकाऱ्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या