Advertisement

मुंबईकरांच्या दिवसभर प्रवासाच्या मागणीवर तूर्तास निर्बंध

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असून, काही भाग सील केले जात आहेत.

मुंबईकरांच्या दिवसभर प्रवासाच्या मागणीवर तूर्तास निर्बंध
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असून, काही भाग सील केले जात आहेत. मागील १० दिवसांत दररोजच्या रुग्णसंख्येत २००हून अधिक वाढ होत असल्यानं महापालिकेनं सावधगिरीचा इशारा दिला आहे. दरम्यान, रुग्णवाढीमुळं प्रवाशांना अद्याप तरी लोकलमध्ये पूर्णवेळ प्रवास करता येणार नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं दिवसभर प्रवासाची मुंबईकरांची मागणी तूर्तास पूर्ण होणं कठीण जाणार आहे.

मुंबईकरांची अद्यापही कोरोनाच्या विळख्यातून सुटका झालेली नाही. मात्र, नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न असल्यानं राज्य सरकारनं २ पावलं मागे घेत काही नियम शिथिल करत १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिली. रेल्वे सुरू झाल्यानंतर रुग्णवाढीचा अंदाज असल्यानं महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तर दुसरीकडे १ ते १० फेब्रुवारीपर्यंतचा आढावा घेतल्यास दररोजच्या रुग्ण संख्येत २०० ते २२५ने चढउतार कायम असल्याचं आढळून आलं आहे.

लोकल प्रवासात वेळेची बंधनं असली तरी गेल्या १० दिवसांपासून पूर्वीप्रमाणं लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याने मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १४७वर आली आहे. २ महिन्यांपूर्वी ही संख्या सुमारे चारशेच्या घरात होती. सीलबंद इमारतींची संख्याही आता घटू लागली आहे.

२ महिन्यांपूर्वी ३ ते साडेतीन हजार इमारती सीलबंद होत्या. ही संख्या १८५६वर आली आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सुमारे २५०० नागरिकांचा शोध घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा