• एसी लोकलची फक्त अफवाच!
  • एसी लोकलची फक्त अफवाच!
SHARE

कडाक्याच्या उन्हात गारेगार वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी उत्सुक आहेत. अजूनही ही लोकल सुरू झालेली नाही. वर्षभरापासून ही एसी लोकल यार्डातच उभी आहे. पण कल्याण-सीएसटीदरम्यान वातानुकूलित लोकल सोमवारपासून धावणार असल्याची अफवा सोशल नेटवर्किंग साईटवर पसरवण्यात आली होती. यासह तिकिटांचे दर काय असतील याबाबतही जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली होती.

पण अजूनही या एसी लोकलची मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी चाचणी घेतली जात आहे. मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरही ही चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी वर्तवली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर फिरणाऱ्या बातम्या केवळ अफवाच असून त्यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन देखील नरेंद्र पाटील यांनी केले आहे. एसी लोकलच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच त्या प्रवाशांच्या सेवेत येतील असेही ते म्हणाले.

दिवसभर असे मेसेज फिरत होते. पण या मेसेजमध्ये तथ्य नाही, या फक्त अफवाच आहेत.

- शैलेश राऊत, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

सोशल साईचवर अफवा पसरवणारे मेसेज -
कल्याण-डोंबिवली-ठाणे-घाटकोपर-दादर-सीएसटी स्थानकांमध्ये या लोकलला थांबा
कुर्ला आणि भायखळा स्थानकात ही गाडी थांबणार नाही

मासिक पाससाठी आकारले जाणारे दर
कल्याण-ठाणे 1200 रुपये
कल्याण-घाटकोपर 1900 रुपये
कल्याण-दादर 3000 रुपये
कल्याण-सीएसटी 3600 रुपये

संबंधित विषय
ताज्या बातम्या