Advertisement

बुधवारी रात्री विक्रोळी ते मुलुंड प्रवास करु नका...अडकाल!


बुधवारी रात्री विक्रोळी ते मुलुंड प्रवास करु नका...अडकाल!
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील नाहूर स्थानकात पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी विक्रोळी ते मुलुंड स्थानकांदरम्यान बुधवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पाॅवरब्लॉक घेण्यात येणार आहे.


मध्यरात्री ब्लॉक

अप आणि डाऊन धिम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार असून ब्लॉग दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरुन वळविण्यात येणार आहे.

विक्रोळी ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर रात्री 1.30 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत, तर मुलुंड ते विक्रोळी अप धिम्या मार्गावर रात्री 2.15 ते मध्यरात्री 3.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.


वाहतूक जलद मार्गावरुन

ब्लाॅक दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरुन वळविण्यात येणार आहे.

घाटकोपर स्थानकातून पहाटे 4.46 ते 5.22 यावेळेत डाऊन धिम्या मार्गावरुन सुटणाऱ्या 6 लोकल विक्रोळी ते मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत. या लोकल गाड्या कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा