Advertisement

शिवडी स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली, हार्बर रेल्वेची वाहतूक उशिरा सुरू


शिवडी स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली, हार्बर रेल्वेची वाहतूक उशिरा सुरू
SHARES

शिवडी रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सकाळी ६.१५ वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत झाली. सध्या हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक एक ते दीड तास उशिरा सुरू आहे. तर अंधेरीहून सीएसटीला जाणारी वाहतूक वडाळापर्यंतच सुरू आहे. 

दरम्यान, ऐन सकाळी आणि गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाली असल्याकारणाने सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सकाळच्या वेळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, पण सेवा विस्कळीत झाल्याने मोठी गर्दी झाली. 


बेस्टची सेवा 

दरम्यान, हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला स्थानकातून पुढच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे मार्गावरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच वडाळा ते सीएसएमटी दरम्यानच्या प्रवाशांनी बेस्ट बसने पुढील प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे. रेल्वेकडून करण्यात आलेल्या विनंतीनंतर बेस्टने हार्बर रेल्वे प्रवाशांसाठी जादा बसेस सोडल्या आहेत. सीएसएमटी ते वडाळा दरम्यान लोकल सेवा लवकर सुरळीत होईल, असंही मध्य रेल्वेने म्हटलं आहे. तर, वडाळा ते पनवेल वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा