श्वान पथकाच्या साहाय्याने विशेष तपासणी

 wadala
श्वान पथकाच्या साहाय्याने विशेष तपासणी
श्वान पथकाच्या साहाय्याने विशेष तपासणी
श्वान पथकाच्या साहाय्याने विशेष तपासणी
श्वान पथकाच्या साहाय्याने विशेष तपासणी
See all

वडाळा - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर पाकिस्तानकडून घातपाती कारवायांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार सोमवारी पोलिसांनी रेल्वे सुरक्षा बल श्वान पथकाच्या मदतीने वडाळा स्थनाकात विशेष तपासणी केली. त्यात अडगळीच्या जागा, शौचालय, तिकीट बुकिंग कार्यालय, पादचारी पूल, उपहारगृह तसंच स्थानकालगतच्या परिसराचीही काटेकोर तपासणी करण्यात आली. मात्र या तपासणीत आक्षेपार्ह वा संशयास्पद असं काहीही आढळलं नाही.

Loading Comments