Advertisement

ठाणे-वाशी मार्गावर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक


ठाणे-वाशी मार्गावर तीन दिवसांचा विशेष ब्लॉक
SHARES

ठाणे-वाशी आणि नेरूळ या ट्रान्स हार्बर मार्गावर 20, 21 आणि 22 एप्रिल या तीन दिवशी दुपारी 12.35 ते 2.05 या दीड तासात विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकदरम्यान रुळांची देखभाल-दुरुस्तीसाठी महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार असून यादरम्यान
ठाणे-वाशी, पनवेल, बेलापूर, नेरुळ या स्थानकादरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. या दोन्ही दिवशी 11 अप आणि 11 डाउन अशा एकूण 22 फेऱ्या रद्द होतील. या दरम्यान प्रवाशांनी अन्य मार्गांचा वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

रद्द होणाऱ्या फेऱ्या
ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या फेऱ्या - दु. 12.12, दु. 12.40, दु. 1.25, आणि दु 1.57
ठाण्याहून नेरुळकडे जाणाऱ्या फेऱ्या - दु. 12.20, दु. 1.10, दु. 1.37
ठाण्याहून पनवेलकडे जाणाऱ्या फेऱ्या - दु.12.52, दु. 1.18, दु. 2.05
वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या फेऱ्या - दु.12.21, दु.12.49, दु. 1.18, दु. 1.40, दु. 2.02
नेरूळहून ठाण्याकडे येणाऱ्या फेऱ्या - दु. 12.10, दु.12.31, दु. 1.00, दु. 1.50
पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या फेऱ्या - 12.18, 13.04

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा