Advertisement

पश्चिम रेल्वे लोकल क्रूच्या देखरेखीसाठी रेकॉर्डिंग सिस्टम स्थापित करेल

केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रिकल मल्टीपल युनिट (EMU) लोकल गाड्यांच्या ड्रायव्हिंग कॅबमध्ये व्हिडीओ आणि क्रू व्हॉईस रेकॉर्डिंग सिस्टम बसवणं आणि कार्यान्वित करणं यांचा समावेश आहे.

पश्चिम रेल्वे लोकल क्रूच्या देखरेखीसाठी रेकॉर्डिंग सिस्टम स्थापित करेल
SHARES

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी १.१० लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता.

याशिवाय, रेल्वे मंत्रालयानं २.८ कोटी प्रकल्प मंजूर केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२०२२ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात इलेक्ट्रिकल मल्टीपल युनिट (EMU) लोकल गाड्यांच्या ड्रायव्हिंग कॅबमध्ये व्हिडीओ आणि क्रू व्हॉईस रेकॉर्डिंग सिस्टम बसवणं आणि कार्यान्वित करणं यांचा समावेश आहे.

हे विचारात घेऊन उपनगरीय नेटवर्कवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वे, क्रू व्हॉईस आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टम उपनगरी लोकल गाड्यांमध्ये आणले जातील. ११० ट्रेनमध्ये ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

मोटरमन आणि रक्षकांच्या केबिनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग स्थापित केलं जाईल आणि केबिनमध्ये एक कॅमेरा बसलेला असेल आणि बाहेर एक. याद्वारे झोनल रेल्वेचे लोकल ट्रेनच्या कामकाजाची छाननी करण्याचे उद्दीष्ट आहे.

यापूर्वी, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गावरील मोटरमनसाठी समुपदेशन सत्रे घेतली होती. रेल्वे रुळांवर एसपीएडीची घटना घडल्यानंतर सत्रे चालवली गेली.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा