Advertisement

शहाड स्थानकाजवळ रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत


शहाड स्थानकाजवळ रुळाला तडे, वाहतूक विस्कळीत
SHARES

ऐन सकाळी गर्दीच्या वेळीच शहाड स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या रुळाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे.


प्रवाशांचा खोळंबा

मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कसारा-मुंबई रेल्वे मार्गावरील शहाड स्थानकाजवळ रुळाला तडे गेले. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.


वाहतूक उशिराने

रुळाला तडे गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर रेल्वे प्रशासनानं तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेतलं. सध्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असलं तरी वाहतूक अजूनही उशिरानं सुरू आहे. ऐन सकाळच्या वेळेत वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा