Advertisement

बेस्ट बसमधून ६० रुपयात करा २४ तास प्रवास

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बसमध्ये फक्त ६० रुपये देऊन शहरभर प्रवास करू शकतात.

बेस्ट बसमधून ६० रुपयात करा २४ तास प्रवास
(File Image)
SHARES

मुंबईकर आता कोणत्याही एसी किंवा नॉन-एसी, मिनी / मिडी / सिंगल किंवा डबल-डेकर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बसमध्ये फक्त ६० रुपये देऊन शहरभर प्रवास करू शकतात. एका तिकिटावर प्रवासी २४ तास अमर्यादित वेळा प्रवास करू शकतो. दिवसभर अमर्यादित प्रवास करण्यासाठी नॉन-एसी प्रवासांसाठी तिकीट ० रुपयात मिळू शकतील.

दिवसातून प्रत्येकवेळी प्रवास करण्यासाठी तुम्हाला सारखं तिकीट काढण्याची गरज नाही. शिवाय तुम्ही आता तिकीट ऑनलाईन बुक करू शकता. हे तिकिट रेडलर अ‍ॅपवर ऑनलाईनही बुक करता येऊ शकते. पुन्हा तिकीट घेण्याच्या अडचणीशिवाय तुम्ही शहर आणि उपनगरामध्ये प्रवास करू शकता.

बुधवार, २३ डिसेंबर रोजी, बेस्ट अधिकाऱ्यांनी देखील अशी घोषणा केली की, एकूण ४९ नवीन इलेक्ट्रिक बस ३१ डिसेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावतील. यासह मुंबईत धावणाऱ्या ई बसेसची संख्या १२१च्या घरात गेली आहे. भविष्यात ४ हजार ८०० पेक्षा जास्त ई बसेस धावताना दिसतील.

दरम्यान, बॅकबे, वरळी, मालवणी आणि शिवाजी नगर आगारांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंगची पायाभूत सुविधा तयार करण्यात आली आहे. ते लवकरच कमीतकमी आणखी 10 डेपोमध्ये येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहरातील सर्व २७ बेस्ट बस डेपोमध्ये ई-चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी करण्यासाठी नागरिक गटानं ऑनलाईन याचिका दाखल केली होती. याचा परिणाम म्हणून, कफ-परेड-सायन मार्गावर या महिन्याच्या सुरूवातीला २६ बस सुरू केल्या गेल्या.हेही वाचा

एसटी महामंडळाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला अल्प प्रतिसाद

प्रवाशांना दिलासा! 'परे'वरील सरकते जिने लवकरच होणार सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा