Advertisement

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, १८ लोकल फेऱ्या रद्द

शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री आपत्कालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, १८ लोकल फेऱ्या रद्द
SHARES

पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री आपत्कालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रात्री १२ ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळं २ दिवस रोज १८ लोकल फेऱ्या रद्द राहणार असून ५ फेऱ्या अंशत: रद्द राहणार आहेत.

लोकल फेऱ्या रद्द

या ब्लॉकमुळं चर्चगेट स्थानकातून ११.०६ वांद्रे, १२.३८ अंधेरी, ०१.०० बोरिवली आणि ५.१५ गोरेगाव या लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. वांद्रे स्थानकातून ०४.५७ बोरिवली, ०५.२० बोरिवली, ०५.३५ बोरिवली आणि ०६.११ बोरिवली या लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तसंच, बोरिवली स्थानकातून ०३.५० चर्चगेट, ०४.०८ चर्चगेट, ०४.२३ चर्चगेट, ०४.२७ चर्चगेट, ०६.०७ चर्चगेट आणि ०६.२० चर्चगेट या लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. 

या लोकल फेऱ्याही रद्द

  • ०५.०६ : महालक्ष्मी ते बोरिवली
  • ०५.२० : दादर ते विरार
  • ०४.०४ : अंधेरी ते चर्चगेट
  • ०४.१३ : विरार ते दादर

या जलद लोकल धीम्या म्हणून धावणार

  • ०४.०५ भाईंदर -चर्चगेट
  • ०३.५३ विरार-चर्चगेट
  • ०४.३६ भाईंदर-चर्चगेट
  • ०४.२५ विरार-चर्चगेट

अशंत: रद्द लोकल

  • ०४.२९ चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान रद्द
  • ०६.१५ बोरिवली ते गोरेगावदरम्यान रद्द
  • ०६.३२ बोरिवली ते गोरेगावदरम्यान रद्द
  • ०४.१९ वांद्रे ते अंधेरीदरम्यान रद्द
  • ०४.३० वांद्रे ते अंधेरीदरम्यान रद्द

या मेल-एक्स्प्रेस रखडणार

  • (५९४४२) अहमदाबाद पॅसेंजर
  • (१२९२८) वडोदरा एक्स्प्रेस
  • (१२९०४) गोल्डन टेम्पल मेल



हेही वाचा -


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा