Advertisement

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नियम धाब्यावर

मुंबई ते पुणे प्रवासासाठी महत्वाचा असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक नियमांचं उल्लंघन करत आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नियम धाब्यावर
SHARES

मुंबई ते पुणे प्रवासासाठी महत्वाचा असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक नियमांचं उल्लंघन करत आहेत. सर्वच वाहनचालक मार्गिका नियमाचं उल्लंघन करत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी जानेवारी महिन्यात नियमभंग करणाऱ्या १३ हजार ७०८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

महामार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईत बस, ट्रक, मोटारी या खासगी वाहनांबरोबरच एसटी या सरकारी वाहतूक सेवेतील बसगाड्यांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांमुळं द्रुतगती महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचंही समजतं.

महामार्ग पोलिसांनी जानेवारीत १३ हजार ७०८ वाहनांवर कारवाई केली. यामध्ये ट्रकचालक मार्गिकेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत असल्याचं समोर आलं. जानेवारीत ५ हजार ४५५ ट्रकचालकांवर मार्गिकांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ मोठमोठे कंटेनर वाहून नेणारी वाहने, मोठ्या टँकरसह २ हजार ६६५ अवजड वाहनांवरही बडगा उगारण्यात आला. यावेळी १ हजार ३४६ खासगी बसचालकांवरही कारवाई करण्यात आली.

सरकारी वाहतूक सेवा देणारे एसटीचे चालकही मार्गिकांचं उल्लंघन करत आहेत. जानेवारीला कारवाईत ३४२ एसटी बसच्या चालकांवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय, पर्यटक वाहनं, डंपर, छोटे टँकर, टेम्पो यांसह अन्य वाहनांवरही बडगा उगारण्यात आला आहे.

वाहनचालकांकडून नियमभंग

  • अवजड आणि प्रवासी वाहनांना मार्गिकेच्या डाव्या बाजूने, तर हलक्या वाहनांना मधल्या मार्गिकेवरून जाणे बंधनकारक आहे. मात्र वाहनचालक त्याचे सर्रास उल्लंघन करतात.
  • मार्गिकेची शिस्त न पाळल्यास मागून येणाऱ्या वाहनाची पुढील वाहनाला धडक बसल्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. मात्र कारवाई करूनही वाहनचालक वठणीवर येत नाहीत.
  • नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना २०० रुपये दंड केला जातो. एखाद्याने यापूर्वीही उल्लंघन केले असल्यास आणि दंड भरला नसल्यास दंडाची रक्कम वाढते.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा