Advertisement

एसी लोकल ट्रेनमधील पाणी गळतीची समस्या दूर, पश्चिम रेल्वेकडून आश्वासन

ता याप्रकरणात पश्चिम रेल्वेने (WR) रेकची तपासणी केली आहे.

एसी लोकल ट्रेनमधील पाणी गळतीची समस्या दूर, पश्चिम रेल्वेकडून आश्वासन
SHARES

मुंबई: विशिष्ट वातानुकूलित लोकल ट्रेनमधील डब्यातून पाणी गळतीच्या वारंवार तक्रारी येत होत्या. आता याप्रकरणात पश्चिम रेल्वेने (WR) रेकची तपासणी केली आहे.

अंडरस्लंग रेक म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका विशिष्ट रेकमध्ये मोटरमनच्या केबिनमधून दुसऱ्या डब्याच्या छतावरून पाणी गळत असल्याचे लक्षात आले. गुरुवारी ही समस्या पहिल्यांदा समोर आली. WR अधिकार्‍यांनी या समस्येकडे लक्ष दिले, परंतु ते शुक्रवारी पुन्हा तसेच झाले. शनिवारी रेकची सखोल तपासणी करण्यास सांगितले.

समस्येचे निराकरण झाले
डब्ल्यूआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक टीमने रेकची कसून तपासणी केली आणि कारशेडमध्ये रात्रभर वातानुकूलन यंत्रणेची चाचणी केली. चाचणी दरम्यान, रेकमध्ये पाण्याची गळती झाल्याचे आढळले नाही, ज्यामुळे WR अधिकार्‍यांना विश्वास दिला गेला की समस्येचे निराकरण झाले आहे. प्रवाशांना आता वातानुकूलित लोकल ट्रेनमधून पाणी गळतीची चिंता न करता प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांना शॉर्टसर्किटची भिती 

प्रवासी संघटनांनी प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि रेल्वेला या घटनेचे कारण त्वरित शोधून काधण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकल ट्रेनचे नियमित प्रवासी शंकर अय्यर यांनी फ्रि प्रेस जनरलला सांगितले की, शॉर्ट सर्किटचा धोका असल्याने ही एक गंभीर समस्या आहे. रेल्वेने ही समस्या तातडीने सोडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सध्या, पश्चिम रेल्वे आठवड्याच्या दिवसांमध्ये दररोज 79 वातानुकूलित लोकल सेवा चालवते, दररोज सरासरी 90,000 प्रवाशांना सेवा देते.

WR अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आश्वासन दिले आहे की, ते सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी जलद कारवाई करतील.



हेही वाचा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा