Advertisement

अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटं उशिरा


अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटं उशिरा
SHARES

गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्यावेळीच अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. अंधेरी आणि जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी रात्री उशिरा पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. पण, ब्लॉकचं काम वेळेत न संपल्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.


वाहतूक २० मिनिटं उशिरा

सध्या चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या वेळापत्रकापेक्षा २० मिनिटे उशिरानं धावत आहेत. विशेषत: धीम्या मार्गावरील वाहतुकीवर याचा अधिक परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा