मुंबईकरांनो! कशी थांबवाल लोकलमधली स्टंटबाजी?

    मुंबई  -  

    मुंबई - मुंबईच्या लोकलमध्ये तरुण मुलांचे वाढते स्टंट दिवसेंदिवस जीवघेणे ठरत आहेत. अनेकदा सोशल मीडियावरचे व्हीडिओ बघून तरुण मुलं स्टंट करताना दिसून येतात. या स्टंटला फक्त सोशल मीडिया किंवा पालक जबाबदार नसून मुलांनी देखील स्वत: हे स्टंट करणे थांबवणे तितकेच महत्वाचे आहे, असं मत अनेक मुंबईकर पालक व्यक्त करत आहेत. गेले अनेक दिवस यावर जनजागृती केली जात आहे. प्रसार माध्यमांमधून यावर बंधन यावे यासाठी प्रयत्न केले जातात. तरीही या मध्ये कोणतेच बदल होत नसल्याचे चित्र दिवसेंदिवस मुंबई शहरात पहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुंबई शहरात अत्यंत महत्वाची मानली जाणारी मुंबई लोकल असुरक्षित असल्याचे मत मुंबईतल्या महिलांनी या वेळी व्यक्त केले आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.