महापालिकाच करणार वांद्रे टाऊन मंडईचा पुनर्विकास

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

मुंबईतील मोडकळीस आलेल्या मंडया अर्थात मार्केटचा खासगी विकासकामार्फत पुनर्विकास करण्याऐवजी महापालिकेनेचं त्यांचा पुनर्विकास स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका लवकरच वांद्र्यातील टाऊन मंडईच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेत आहे. नवीन धोरणानुसार पुनर्विकासीत होणारी ही पहिलीच मंडई ठरणार आहे.

४ एफएसआय

एच/पश्चिम विभागातील बाजार रोडवरील टाऊन मंडईची जागा महापालिकेच्या ताब्यात असून या मंडईचा पुनर्विकास महापालिका करणार आहे. पुनर्विकासीत होत असलेल्या या मंडईला ४ एफएसआयचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या मंडईच्या जागेचा वापर हा २ भागांमध्ये केला जात आहे. एका भागात मासळी बाजार असून दुसऱ्या भागात भाजी व फळे यांचा बाजार आहे.

७० वर्षे जुनी इमारत

मासळी बाजाराची इमारत ही ७० वर्षे जुनी असल्याने या ठिकाणी सर्व विक्रेत्यांसाठी संक्रमण शिबिराची पर्यायी व्यवस्था करून दुसऱ्या जागेवर पुनर्विकासाची इमारतीचं बांधकाम केलं जाणार आहे. मासळी बाजाराच्या जागेवर एक मजली इमारतीची पुनर्बांधणी करताना दुसऱ्या जागेवर पुनर्विकास करून ४ मजली मंडईची इमारत उभारली जाणार आहे.

'असे' असतील गाळे

तळ मजल्यावरील जागेवर मासे, मांस विक्रीसाठी गाळे तर त्यावरील तळघरात कोंबडी मांस विक्रेते, फळे, भाज्या यांचे गाळे असणार आहेत. तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रकल्पबाधितांसाठी गाळे आणि तिसरा व चौथा मजल्यावर हॉल अशी रचना या पुनर्विकासात करण्यात येणार आहे. विद्यमान दुकान विक्रेत्यांना सामावून घेण्यासाठी विद्यमान मासे बाजाराच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर तात्पुरते स्टीलचे पॉलिकार्बोनेट पत्र्याच्या छतासह बांधकाम केलं जाणार आहे.


हेही वाचा-

महापालिकेच्या मंडयांचे शुल्क दुपटीने वाढले, कोळी भगिनींसह सर्व गाळेधारकांच्या खिशाला भार

मुंबईत टेक्सटाईल म्युझियमच्या कामाला लवकरच सुरुवात

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र?


पुढील बातमी
इतर बातम्या