Advertisement

माहीमच्या गोपी टँक मार्केटचा पुनर्विकास रद्द?

गोपी टॅंक मार्केटच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली असून विकासाकाकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे स्वत:च याची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

माहीमच्या गोपी टँक मार्केटचा पुनर्विकास रद्द?
SHARES

मुंबई महापालिकेच्या माहीम येथील गोपी टॅंक मार्केटच्या पुनर्विकासाला देण्यात आलेली मान्यता आता रद्द करण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून गोपी टॅंक मार्केटच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली असून विकासाकाकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे स्वत:च याची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


दोनदा दिली मुदतवाढ, पुनर्विकास मात्र नाहीच!

माहिममधील सिटी लाईट सिनेमागृहासामोरील गोपी टँक मार्केटच्या पुनर्विकासाला २००९मध्ये मान्यता देण्यात आली होती. या मंडईतील परवानाधारक गाळेधारकांनी श्री साईनाथ सहकारी व्यापारी संकुल संस्था स्थापन करून ७० टक्के लोकांच्या संमतीने 'मेसर्स ओंकार रिअॅटल्स डेव्हलपर्स' यांची विकासक आणि 'दाभोळकर अॅण्ड दाभोळकर' यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक केली होती. यांना प्रथम २००९ मध्ये इरादा पत्र दिले होते, ३६ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा २०१३ मध्ये मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतही फेब्रुवारी २०१६ मध्ये संपली.


आता महापालिका दुरुस्ती करणार

यासंदर्भात ऑक्टोबर २०१६ मध्ये विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याबाबत सुनावणी घेऊन गोपी टँक मार्केटला देण्यात आलेले उद्देशपत्र रद्द करून या मार्केटचा पुनर्विकास तथा दुरुस्ती महापालिकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


कंत्राट विकासकाला, खर्च पालिकेचा!

सन २०११-१२ मध्ये मार्केटच्या दुरुस्तीसाठी सुमारे ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यामध्ये गोपी टँक मार्केटसाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्यानंतरही यावर किरकोळ खर्च करण्यात आला. त्यामुळे ही सर्व जबाबदारी विकासकाची असताना, त्यावर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून एकप्रकारे विकासकाच्या खांद्यावरील भार हलका केला होता. मात्र, हा खर्च विकासकाकडून वसूल करण्याऐवजी महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.



हेही वाचा

महापालिकेचा दणका! प्रीमियम थकवणाऱ्या १८ पुनर्विकास प्रकल्पांना 'स्टॉप वर्क' नोटीस


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा