Advertisement

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र?


महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र?
SHARES

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र सुरु करण्याची मागणी नगरसेवकांकडून होऊ लागली आहे. शारीरिक व्यंग, अपघात यामुळे निर्माण झालेले दोष दूर करण्याकरीता महापालिकेने अशा प्रकारचे केंद्र उभारण्याची मागणी केली जात आहे.


कारण काय?

महापालिका सभागृहनेते यशवंत जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. सुंदर दिसण्यासाठी तसेच स्थूलतेमुळे निर्माण होणाऱ्या व्याधींवर मात करण्यासाठी बरीच श्रीमंत व्यक्ती महागड्या कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेत असतात.

कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे केवळ सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया नाहीत तर सुंदर दिसण्यासह योग्य वैद्यकीय कारणांसाठीही अशा शस्त्रक्रियांची मोलाची मदत होत असल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे.



महागडे उपचार

अपघात, शारीरिक दोष आणि व्यंगामुळे लहान वयात आलेल्या विकृती आदिंवर प्लास्टिक सर्जरी वा कॉस्मेटिक सर्जरीद्वारे उपचार करणे शक्य असतात. मात्र हे महागडे उपचार रुग्णांना परवडत नाहीत. महापालिकेच्या रुग्णालयात मुंबई व मुंबई बाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात आणि रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे आपलं बंधनकारक कर्तव्य महापालिका चोखपणे पार पाडत असते.

गरजू रुग्णांना या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा तसेच योग्य वैद्यकीय कारणांसाठी या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने अशाप्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं असल्याचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

'फ्रि फ्लॅप प्लास्टिक सर्जरी'ने दिलं जगण्याचं बळ

शुटिंग दरम्यान अपघात, कलाकाराला करावी लागली प्लास्टिक सर्जरी!



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा