Advertisement

शुटिंग दरम्यान अपघात, कलाकाराला करावी लागली प्लास्टिक सर्जरी!


शुटिंग दरम्यान अपघात, कलाकाराला करावी लागली प्लास्टिक सर्जरी!
SHARES

'शुटींगदरम्यान अमूक कलाकाराला झाली इजा' अशा शीर्षकाच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. आपल्या कामात चोखपणा आणण्यासाठी भूमिकेत प्राण ओतणा-या प्रत्येक कलाकाराला अशा घटनांना कधी ना कधी सामोरे जावे लागते. अशीच एक घटना लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी 'गच्ची' या सिनेमातील अभिनेता अभय महाजनसोबत घडली. नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली गच्चीवर झालेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभय आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता कि, तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहकारी कलाकार प्रिया बापटसोबतचा एक सीन शूट करत असताना, अभयचा तोल गेला आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला.



स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिल्यामुळे बेसावध असलेल्या अभयला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. कठडा जोरात लागल्यामुळे त्याच्या कपाळावर भलीमोठी खोकदेखील पडली होती. जखम अधिक खोल असल्यामुळे त्यावर टाके मारावे लागले होते. मात्र, शुटींगचा तिसराच दिवस असल्याकारणामुळे, संपूर्ण सिनेमा चित्रित होणे बाकी होते. त्यामुळे अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसणार होते. असे होऊ नये, म्हणून अभयच्या कपाळावर प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली. सिनेमाच्या चित्रीकरणारंभालाच झालेल्या या अपघातामुळे, संपूर्ण युनिटदेखील हादरून गेले होते. मात्र 'शो मस्ट गो ऑन' म्हणत अभयने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.



येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेली 'गच्ची' वरील ही गोष्ट, सिनेरसिकांना मनोरंजांची मोठी मेजवानी देऊन जाईल.



हेही वाचा

वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार 'राजन' !


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा