Advertisement

वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार 'राजन' !


वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार 'राजन' !
SHARES

भारत सुनंदा दिग्दर्शित बहुचर्चित 'राजन' या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर आणखीन एक नवे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. 'राजन' या शिर्षकावरुनच सिनेवर्तुळात दबदबा निर्माण करणाऱ्या या सिनेमात अभिनेता राकेश बापट मध्यवर्ती भूमिकेत आहे. आत्तापर्यंत चार्मिंग बॉयच्या भूमिकेत दिसलेला राकेश, या सिनेमात मात्र 'अँग्री यंग मॅन' साकारताना दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या नव्या पोस्टरवरील त्याचा अँग्री लूक दिसून येत असून, मुंबईच्या तत्कालीन १९९३ सालच्या गुंडागिरीवर हा सिनेमा बेतलेला आहे.

 


या सिनेमाचं नाव जरी 'राजन' असलं तरी, तो कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याचे उद्दिष्ट यात आहे. तत्कालीन मुंबईची चाळसंस्कृती आणि त्यातून फुलत जाणारी प्रेमकथा देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'राजन' सिनेमाची वामन पाटील, सुरेखा पाटील आणि दिप्ती बनसोडे यांनी निर्मिती केली आहे. वर्षाअखेरीस हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.



हेही वाचा

सोनाली, प्राजक्ताच्या 'हंपी'चा ट्रेलर लॉन्च!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा