दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील कोरोनोव्हायरस (Mumbai COVID 19 Case)च्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये, विशेषत: उत्तर मुंबईत Coronavirus च्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यां मार्फत कठोर आणि महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत.

मुंबईतील नवीन रुग्णांचा प्रभागवार वाढीचा दर सध्या १.५८ टक्के आहे. तथापि, शहरातील दहा प्रभागांचा सरासरी रुग्ण वाढीचा दर मुंबईच्या एकूण सरासरी दरापेक्षा जास्त आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या अहवालानुसार उत्तर मुंबईच्या भागात COVID 19 च्या रुग्णांचे प्रमाण बरेच जास्त आहे. ६ जुलै २०२० अखेरच्या सात दिवसांच्या आकडेवारीनुसार प्रभाग T (मुलुंड) मध्ये ३.४ टक्के रुग्ण वाढीचा वेग आहे.

वॉर्ड R - उत्तर, मध्य आणि दक्षिण हे तिन्ही भाग (दहिसर, बोरिवली आणि कांदिवली) कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या तिन्हीपैकी प्रभाग आर-मध्य (बोरिवली) मध्ये कोरोना रुग्णांचा वाढीचा वेग ३.२ टक्के आहे. जो की सर्वात जास्त आहे. यानंतर, R उत्तर (दहिसर) मधील कोरोनाचा विकास दर २.८ टक्के आहे. तर R-दक्षिण (कांदिवली) प्रभागाचा वाढीचा वेग २.५ टक्के आहे. तर P-उत्तर (मालाड)मध्ये तो २.३ टक्के आहे.


हेही वाचा : Coronavirus Patients : मुंबईच्या 'या' परिसरात कमी रुग्णसंख्या


जर आपण या तीन क्षेत्रांचे प्रभागनिहाय विश्लेषण केलं तर समोर येतं की, कोरोनाच्या वाढीच्या वेगामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यानुसार प्रभाग R-दक्षिण (कांदिवली) मध्ये ३ हजार ३३० रुग्ण आहेत. R-मध्य (बोरिवली) मध्ये ३ हजार २६५ आणि प्रभाग R उत्तर (दहिसर) मध्ये १ हजार ९३८ रुग्ण आहेत. मुंबईतील वॉर्ड P-उत्तर (मालाड)मध्ये जास्त रुग्ण समोर आले आहेत.

तर या तीन प्रभागांमध्ये रुग्णांचा डबलिंग रेट सर्वात कमी आहे. प्रभाग T (मुलुंड) मध्ये रुग्णांचा डबलिंग रेट २८ दिवसांवर आहे. प्रभाग R-मध्य (बोरिवली) मध्ये २२ दिवस, ई-दक्षिण (कांदिवली) मध्ये २५ दिवस, प्रभाग R-उत्तर (दहिसर) मध्ये २८ दिवस, तर प्रभाग P उत्तर (मालाड) मध्ये 31 दिवस आहे. ही संख्या मुंबईच्या डबलिंग रेटपेक्षा कमी आहे. मुंबईमध्ये रुग्णांचा डबलिंग रेट सध्या ४४ दिवस आहे.

सध्याची परिस्थिती पाहता मुंबई महानगरपालिकेनं अनेक भाग आणि इमारती सील केल्या आहेत. शहरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या बोरिवलीत ८३० इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर वॉर्ड P उत्तर (मालाड) आणि वॉर्ड R दक्षिण (कांदिवली) इथं अनुक्रमे ४८४ आणि १९४ आणि प्रभाग R उत्तर (दहिसर) मध्ये 552 इमारती सील केल्या आहेत.


हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये घरातील विलगीकरण बंद, 'हे' आहे कारण

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

पुढील बातमी
इतर बातम्या