Advertisement

Covid-19 in thane: ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ५० हजार पार

ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ५०,८२९ वर जाऊन पोहोचली आहे.

Covid-19 in thane: ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ५० हजार पार
SHARES

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने मंगळवारी ५० हजारांचा टप्पा पार केला. राज्यात मंगळवारी ५१३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. या रुग्णांपैकी १३४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण हे एकट्या ठाणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ५०,८२९ वर जाऊन (coronavirus patients cross 50 thousand mark in thane district) पोहोचली आहे.

सोमवारी ठाणे जिल्ह्यात एकूण ४९,४८५ काेरोनाबाधित रुग्ण होते. त्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८,६७२ इतकी तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २९,४८५ इतकी होती. त्यात मंगळवारी १३४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने ठाणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५०,८२९ वर जाऊन पोहोचले आहे. त्यात बरे झालेले रुग्ण १९,४५९ आणि ॲक्टिव्ह रुग्ण २९,९८८ इतके आहेत. 

हेही वाचा- ठाण्यात मुंबईपेक्षा कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अधिक

राज्यात मंगळवारी २२४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यांत ठाणे-७ आणि ठाणे मनपा क्षेत्रातील १३ कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या १३८१ वर गेली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत सध्या ठाण्याच्या पुढे मुंबईचा क्रमांक आहे. मुंबईत ८६,५०९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी ५८,१३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २३,३५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहे. शिवाय ५००२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मंगळवारपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा