चेंगराचेंगरीतील पीडितांना घरपोच नुकसानभरपाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम रेल्वेने परळ-एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत प्राण गमावणाऱ्या आणि जखमींना तात्काळ नुकसानभरपाई दिली. या घटनेतील मृतांचे नातेवाईक आणि जखमींना एक कोटी ३४ लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्षात देण्यात आली आहे.

एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेतील २३ पैकी २१ मृतांचे नातेवाईक आणि ३४ जखमींना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. त्यात दोघा मृतांच्या नातेवाईकांनी रोख रकमेऐवजी धनादेश देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, रेल्वेने अनुक्रमे अलाहाबाद, सातारा येथे कर्मचारी रवाना केले आले. त्यात, रविवारी प्रियांका पासलकर यांच्या वडिलांना सातारा येथील घरी जाऊन धनादेश देण्यात आले. त्याचप्रमाणे अलाहाबाद येथेही सोमवारी काही कर्मचारी रवाना झाले. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दुर्घटनेतील प्रत्येक मृत आणि जखमी व्यक्तीस त्याच दिवशी नुकसानभरपाई देण्याचे प्रयत्न केले. इतर नोंदी तपासून अन्य दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना नुकसानभरपाई देण्यासाठी धनादेश देण्यात आल्याचे सांगितले.


हेही वाचा - 

आता साडेनऊ कोटी खर्चून एल्फिन्स्टनवर बांधणार पूल

म्हणून, एल्फिन्स्टन पुलावर 22 जणांचा बळी गेला


पुढील बातमी
इतर बातम्या