Advertisement

म्हणून, एल्फिन्स्टन पुलावर 22 जणांचा बळी गेला


म्हणून, एल्फिन्स्टन पुलावर 22 जणांचा बळी गेला
SHARES

मुंबईतल्या एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला तर ३९ जण जखमी झाले. या घटनेला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मुंबईकरांनी केला आहे.  

काही वर्षांपूर्वी हा पूल दुरुस्त करा असे रेल्वे प्रशासन आणि अधिकाऱ्यांना सांगितले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यामुळेच आज २२ जणांचा बळी गेला असल्याचा आरोप स्थानिकांसह इतर प्रवाशांकडून होत आहे. त्यासाठी प्रवासी आणि स्थानिकांनी 'We want a better Bridge on the Parel Railway Station' नावाचा फेसबुक पेजही तयार केले आहे. 



शुक्रवारी पश्चिम रेल्वेवर जादा फेऱ्यांचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल मुंबईत आले असतानाच ही घटना घडल्याने त्यांचे मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. 

सध्या सर्व जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींसोबत मृतदेह देखील केईएम रुग्णालयात नेण्यात आले आहे.

या संदर्भात माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी देखील ट्विट केले आहे. या उड्डाणपूल रुंदीकरणाबाबत माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंकडे निवेदन केल्याकडे त्यांनी ट्विटद्वारे लक्ष वेधून घेतले.   



शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही या पुलाच्या दुरुस्तीसंदर्भात २०१५ मध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदन दिले असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  




हेही वाचा - 

Live: एल्फिन्स्टन पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी, 22 ठार, 39 जखमी


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा