दहिसर, बोरिवली , कांदिवली आणि मालाडमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पश्चिम उपनगर पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. या भागातील लॉकडाऊनच्या नियमांचे पालिका आणि पोलिस प्रशासन काटेकोरपणे पालन करीत आहेत. तरीही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगर बोरिवलीमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यासह, मालाडमध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

पालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २५ ऑगस्टपर्यंत मालाडमध्ये एकूण ८ हजार २०९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दहिसरमध्ये २५ ऑगस्टपर्यंत ३ हजार ५९४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. २५ ऑगस्टपर्यंत बोरिवलीमध्ये कोरोनाव्हायरसची एकूण संख्या ७ हजार ५०७ वर पोहोचली आहे. २५ ऑगस्टपर्यंत कांदिवलीमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६ हजार ६५४ वर पोहोचली आहे.


हेही वाचा

मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवर

नॉनकोविड रुग्णांसाठी आता सहज उपलब्ध होणार रुग्णवाहिका

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या