Advertisement

नॉनकोविड रुग्णांसाठी आता सहज उपलब्ध होणार रुग्णवाहिका

नॉनकोविड रुग्णांनाही रुग्णवाहिका उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

नॉनकोविड रुग्णांसाठी आता सहज उपलब्ध होणार रुग्णवाहिका
SHARES

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात व विलगीकरण केंद्रात दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकांचा वापर करण्यात आला. रुग्णवाहिकांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जात असल्यानं नॉनकोविड रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. परंतु, आता मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. तसंच, नॉनकोविड रुग्णांनाही रुग्णवाहिका उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

मुंबई शहर उपनगरात १०८च्या ९३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत, यामध्ये कोरोनासाठी ६४ रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या. या १०८च्या रुग्णवाहिकांनी मार्च महिन्यापासून १५ ऑगस्टपर्यंत मुंबईतील अनेक रुग्णांना सेवा दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णवाहिकांनी ३४ हजार ९९० रुग्णांना सेवा दिली असून, त्यातील २५ हजार ८८५ कोरोना रुग्ण होते, तर ९ हजार १०५ नॉनकोविड रुग्ण होते.

मुंबईत आता बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ८१ टक्क्यांवर पोहोचलं असून, एक लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचे संकट आल्यापासून राज्यात १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी अखंड रुग्णसेवा केली आहे. कोरोनासह अन्य आजाराच्या रुग्णांनाही आपला जीव धोक्यात घालून सेवा पुरवली आहे.



हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्क्यांवर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा