Advertisement

दादर, माहीममधील टॉवरमधील रहिवाशांसाठी १९९९ रुपयांमध्ये चाचणी

टॉवरमधील रहिवाशांसाठी महापालिकेनं कोरोना चाचणी सवलतीच्या दरात उपलब्ध केली आहे.

दादर, माहीममधील टॉवरमधील रहिवाशांसाठी १९९९ रुपयांमध्ये चाचणी
SHARES

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला धारावी परिसर आता कोरोनामूक्तीच्या दिशेनं जात आहे. धारावीत महापालिकेनं विषेश लक्ष देत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, धारावीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असताना दादर आणि माहीम परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या भागातील इमारतींमधील रहिवाशांना कोरोनाची बाधा होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं या परिसरातील टॉवरमधील रहिवाशांसाठी महापालिकेनं कोरोना चाचणी सवलतीच्या दरात उपलब्ध केली आहे.

टॉवरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं महापालिकेनं विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. टॉवरमधील रहिवासी कोरोनाची चाचणी करण्यासाठी येत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर जी-उत्तर विभागानं टॉवरमधील रहिवाशांसाठी घरीच सवलतीच्या दरात कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

या चाचणीसाठी एसआरएल प्रयोगशाळेबरोबर करार करण्यात आला असून दादर, माहीम, धारावीतील इमारतींमधील रहिवाशांच्या घरी जाऊन १९९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करण्यात येत आहे. दररोज किमान १० ते १५ जण सवलतीच्या दरात करोना चाचणी करीत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने करोना चाचणीसाठी २५०० रुपये दर निश्चित केला आहे.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागानं धारावीबरोबरच दादर आणि माहीम परिसरावर लक्ष केंद्रित केलं आहे. दादर, माहीम, धारावीतील ५८७ रहिवाशांना दादरच्या कोहिनूर स्क्वेअरच्या वाहनतळात विनाशुल्क चाचणी करून घेतली. दादर, माहीममध्ये व्यापक प्रमाणावर कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दादरमधील शिवसेना भवनासमोरील कोहिनूर स्क्वेअरच्या वाहनतळात वस्त्या, चाळींमधील सर्वसामान्य रहिवाशांसाठी विनाशुल्क कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. आतापर्यंत इथं ५८७ जणांनी कोरोनाची चाचणी केल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ५८७ नवे रुग्ण, ३५ जणांचा दिवसभरात मृत्यू

लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा