अँटिलीया स्फोटक प्रकरण : एनआयएने दोेघांना केली अटक

उद्योगपती मुकेश अंबानी (mukesh ambani) यांच्या अँटिलीया (Antilia) या निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए - nia) दोन जणांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद अशी आरोपींची नावं आहेत.  दोघांना २१ जूनपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठविण्यात आलं आहे.

एनआयएनं मुंबईच्या मालाड परिसरातून दोघांना अटक केली आहे. ११ जून रोजी एनआयएनं त्यांना ताब्यात घेतलं आहे. अँटिलीयाबाहेर स्फोटकांसह जी स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती त्या कटात सहभाग असल्याचे काही पुरावे हाती लागल्याने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरन याच्या हत्येतही सहभाग होता का याचा तपास एनआयए करत आहे.

अँटिलियाबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकं ठेवलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या व धमकीपत्र आढळलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच कारचा मालक मनसुख हिरन याचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीत आढळला होता. हा संपूर्ण कट पोलीस अधिकारी सचिन वाझे याने रचल्याचं उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ त्याला मदत करणाऱ्या रियाज काझी या पोलीस अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आली होती.



हेही वाचा -

मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीच्या मार्गावर

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई

पुढील बातमी
इतर बातम्या