सचिन वाझेंचे सहकारी रियाझ काझी पोलीस दलातून बडतर्फ

स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनं सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझे यांच्या चौकशीनंतर काझी यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं होतं.

सचिन वाझेंचे सहकारी रियाझ काझी पोलीस दलातून बडतर्फ
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षत सचिन वाझे यांना नुकतंच पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ आता  एनआयच्या अटकेत असलेले वाझे यांचे सीआययूतील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांनाही पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे.

स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनं सचिन वाझे यांना अटक केली होती. वाझे यांच्या चौकशीनंतर काझी यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एनआयएनं काझी यांना अटक केली होती. काझी यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. 

आता काझी यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून शुक्रवारी या कारवाईचे आदेश जारी केले.  

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यासाठी आणि त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी तसेच हे गुन्हे करण्याआधीही वाझे हे गाड्यांच्या नंबर प्लेट वारंवार बदलले होते. त्याचवेळी काझी हे विक्रोळीतील नंबर प्लेट तयार करणाऱ्या एका दुकानात जाताना सीसीटीव्ही कॅमेरात दिसले होते. याखेरीज वाझे यांच्या ठाण्यातील सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी जाताना काझी हे अन्य एका सीसीटीव्ही कॅमेरात दिसले होते.



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा