Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 'इतक्या' दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. गुरुवारी हा पाणीसाठा १८ टक्के म्हणजे सुमारे २ लाख ४८ हजार दशलक्ष लिटर इतका शिल्लक होता. २५ जुलैपर्यंत ६५ दिवस पुरेसा हा पाणीसाठा आहे. जूनमध्ये वेळेत मान्सूनचं आगमन न झाल्यास मुंबईत पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते.

गेल्या वर्षी दमदार पावसानं तलावांमध्ये पुरेशा प्रमाणात साठा शिल्लक राहिला; मात्र मे महिन्याच्या अखेरपर्यंत साठा कमी होत जात असल्यानं पालिकेची धाकधूक वाढते आहे. सर्व तलावांमध्ये मिळून गुरुवारी २ लाख ४८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात २१ टक्के, २०१९मध्ये १३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सोमवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील पावसामुळे दोन हजार दशलक्ष लिटरची वाढ झाली, मात्र ती समाधानकारक नाही. पाऊस तुळशी, विहार, मोडकसागर या तुलनेने लहान तलावांमध्ये झाला असून जमा झालेले पाणी मुंबईच्या रोजच्या पुरवठ्यापैकी ५० इतके आहे.

जूनमध्ये पावसाची चांगली सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ३० जूनपर्यंत पाण्याची पातळी सुस्थितीत असल्यास पाणीकपातीचे संकट मुंबईकरांवर येणार नाही. मात्र, पाऊस पडूनही तलावातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ न झाल्यास, मुंबईकरांना कपातीचा सामना करावा लागू शकतो.



हेही वाचा -

पुन्हा एकदा आयपीएल सुरु होणार?

मुंबईच्या 'या' भागात कोरोनाचे नियम धाब्यावर


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा