COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

सचिन वाझे पोलीस खात्यातून बडतर्फ

लवकरच पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

सचिन वाझे पोलीस खात्यातून बडतर्फ
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटकेत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षत सचिन वाझे यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यांच्या बडतर्फीचे आदेश काढले आहेत. 

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी रोजी सापडली होती. त्यानंतर ४ मार्च रोजी कारचा मालक मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर वाझे यांना निलंबीत करण्यात आलं होतं. त्यांना बडतर्फ केले जाईल अशीही चर्चा होती. अखेर कलम ३११ अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे यांना बडतर्फ केलं आहे. अँटिलिया आणि हिरेन हत्या प्रकरणामुळे संपूर्ण कटामुळे मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली. असे कार्य अशोभनीय असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सचिन वाझे १६  वर्षांनंतर २०२० मध्ये पोलिस दलात परतले होते. मात्र, त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. याशिवाय लवकरच पोलीस अधिकारी रियाझ काझी आणि सुनील माने यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. वाझेंसोबत असलेला रियाझ काझी या एपीआयला देखील निलंबित करण्यात आलं आहे. त्यानेही पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेंना मदत केली होती. 

सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत. माने यांना अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा एनआयएने केला होता.हेही वाचा

कोविन पोर्टलमध्ये करण्यात आले हे नवीन बदल, जाणून घ्या प्रक्रिया

ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा