१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'जिओ ज्ञानगंगा'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी आता ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, आता दूरचित्रवाणी वाहिनीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. 

जिओ टीव्हीवर १२वी विज्ञान आणि १०वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी ‘जिओ ज्ञानगंगा’ या ३ वाहिन्यांचं रविवारी उद्घाटन करण्यात आलं. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर जिओ सावन या रेडिओ चॅनेलवर ‘वुई लर्न इंग्लिश’ या कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा - CA May 2020 परीक्षा रद्द, नोव्हेंबरमध्ये नवं वेळापत्रक

जिओ टीव्हीवरील ३ वाहिन्यांवर रोज ६ तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर १८ तास त्याचे पुनप्रक्षेपण केलं जाणार आहे. याचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळा व कॉलेज बंद असले तरी राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपाय योजण्यात येत आहेत.

येत्या काळात अजून ९ वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. १०वी उर्दू माध्यम, नववी, आठवी, सातवी, सहावी, तिसरी आणि चौथी या इयत्तांसाठी इंग्रजी, उर्दू आणि मराठी माध्यमातील वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. ‘राज्यातील ४.३ कोटी लोकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहेत. जिओ टीव्हीद्वारे विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा -

अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी


पुढील बातमी
इतर बातम्या