अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्राथमिक तपासात हे कुणीतर हे कृत्य खोडसाळपणातून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
SHARES

पाकिस्तानच्या स्टॅक एक्सचेंजवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबईच्या ताज हाँटेलवर पून्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याची धमकी अतिरेक्यांकडून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कुलाबा पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फोन करणाऱ्याने  दोन वेळा फोन करून धमकी दिली असून दोन्ही फोनमध्ये चार मिनिटांचे अंतर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे कुणीतर हे कृत्य  खोडसाळपणातून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- Keep an identity card in your pocket घराबाहेर पडताना खिशात ओळखपत्र ठेवा, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जा

मुंबईत आधीच कोरोनान संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भारत-चीन मध्येही संबध खराब झाल्यामुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पाकिस्तान सीमेवर दहशतावद्यांशी जवान दोन हात करत आहे. अशातच एक नवी डोकेदुखीने सुरक्षा यंत्रणेवर भार कामाला लागली आहे. सोमवारी मध्यरात्री  ताज महल पॅलेसच्या फ्रंट ऑफिसमध्ये ३० जुलै मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनीटांनी  प्रथम धमकीचा दूरध्वनी आला होता.  ‘मै लष्कर ए तोयबा से बोल रहा हु मेरा नाम सुलतान है’ असे बोलुन दूरध्वनी कट केला.  या फोननंतर टेलिफोन आँपरेटरने तातडीने या फोनची माहिती पोलिसांना दिली. तसेच हाँटेलबाहेर असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांना सर्तक केले. तो फोन येऊन काही मिनिट होत नाही तोच पून्हा काऊन्टरवरचा फोन वाजला. फोन उचलताच, हा दूरध्वनी एक्सटेन्शनच्या सहाय्याने सुरक्षा एक्झिक्युटीव्हला जोडण्यात आला. दूरध्वनी करणा-या व्यक्तीने पून्हा  ‘मै सुलतान बोल रहा हुँ.  मै लष्कर ए तोयबा से हुँ और मै पाकीस्तान से बोल रहा हुँ. हॉटेल ताज पे जो पहीले अॅटॅक हुआ था, वैसाही अॅटॅक हम फिर से करनेवाले है और हम इसकी प्लनिंग बहोत जल्द करनेवाले है’ असे म्हणाला. त्यावर सुरक्षा एक्झिक्युटीव्हने ‘आपका पुरा नाम क्या है, असे विचारले असता मैने पहले ही कहाँ है की, मेरा नाम सुलतान है. मै लष्कर ए तोयबा से हूँ और मै पाकीस्तान से बेल रहा हूँ, असे बोलून त्याने फोन कट केला. त्यानंतर या घटनेबाबत प्रभारी सुरक्षा रक्षकाला याची माहिती देण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी महाराष्ट्रासह मुंबईत हायअलर्ट जारी केला. इतकेच काय तर मुंबईतल्या प्रमुख स्थळांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली.

हेही वाचाः- Transfers of IPS and SPS officers canceled सरकारचा प्रशासकिय गोंधळ सुरूच, IPS  आणि SPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मागे

या प्रकऱणी पोलिसांनी अखेर कुलाबा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 505(1)(ब), 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्याने तो फोन उचलला त्याचा जबाब ही नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरी प्राथमिक तपासात हा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय असून संबंधीत दूरध्वनी क्रमांकाच्या सहाय्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा