Advertisement

Online Exam: ऑनलाईन परीक्षांना युवासेनाचा विरोध


Online Exam: ऑनलाईन परीक्षांना युवासेनाचा विरोध
SHARES
मुंबईसह राज्यभरातील सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. कॉलेज बंद असल्यानं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न निर्माण झाला. या परिक्षांवरुन मागील काही दिवसांपासून वाद-विवाद होताना पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाण, ‘इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आयसीटी) या अभिमत विद्यापीठाच्या परिक्षांना युवासेनेने विरोध केल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास युवासेनेसह काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अंतिम वर्षांच्या परीक्षा ‘ऐच्छिक’ करण्याचा पर्याय विद्यापीठांना दिला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने परीक्षा न घेता विद्यापीठे वेगळे मार्ग शोधत आहेत. 

आयसीटीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा बुधवारपासून सुरू झाल्या. ऑनलाइन किंवा ई-मेलच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात येत आहेत. पुस्तकाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे. अपवादात्मक स्थितीत एखाद्या हाताने उत्तरे लिहून छायाचित्र पाठवल्यास तेही ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

या परीक्षा घेण्यास युवासेनेने विरोध केला. तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी ‘शासन निर्णया’नुसार परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाला दिले आहेत. शासनाने अंतिम विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ‘ऐच्छिक’ केल्या आहेत. या निर्णयानंतर शासनाने कोणतेही नवे आदेश दिलेले नाहीत. 

या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या संमतीने परीक्षा घेण्यात येऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगानेही परीक्षांबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या विविध शिखर परिषदांनीही अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.



हेही वाचा -

अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा