पिंपळेश्वर मित्र मंडळाची कोरोना योद्धांना मानवंदना

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळावे व या संकटातून मुंबईकरांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार आपल्या जीवाची बाजी लावत आहे. त्यामुळं या कोरोना योद्धांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सावात अनोखे देखावे सादर करण्यात आले आहेत. अशाच एका दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील पिंपळेश्वर मित्र मंडळ, 'पिंपळेश्वरचा बाप्पा' या मंडळानं अनोखा देखावा सादर केला आहे.

पिंपळेश्वर मित्र मंडळानं बाप्पाच्या मूर्तीच्या प्राभावळीतून देखावा सादर केला आहे. या मंडळानं कोरोना व्हायरसप्रमाणं मराठी सणांचं महत्व सांगणारा देखावाही सादर करण्यात आला आहे. मुंबईत देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळं सर्वच सण-उत्सवांवर संकट आलं आहे. मार्च महिन्यात कोरोनान भारतात प्रवेश केल्यानं मराठी नववर्षाची सुरुवात करणारा गुढीपाडव्याचा सण अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात आला. दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या पालख्या यंदा रद्द करण्यात आल्या. तसंच, पंढरपूरात आषाढी निमित्त दाखल होणाऱ्या पायी दिंडी सोहळा रद्द झाला. सध्या गणेशोत्सव सुरू असून, राज्य सरकरानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केल्यानं उत्सव साधेपणानं साजरा केला जात आहे.

यंदा मंडळानं सामाजिक कार्य करण्याचाही निर्णय घेतला आहे. या परिसरातील गणपतीचं विसर्जन बाणगंगा तलावात केलं जातं. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना या ठिकाणी विसर्जन करणं शक्य होत नाही. त्यामुळं वाळकेश्वर येथील पिंपळेश्वर मित्र मंडळ व सुभाष चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी थर्माकोल आणि लाकडाचा वापर करून बोट तयार केली आहे. या बोटीच्या माध्यमातून घरगुती बाप्पांसह सार्वजनिक बाप्पांच विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती पिंपळेश्वर मंडळाचे कार्यकर्ते बिपीन कोकोटे यांनी दिली.

या मंडळातील कार्यकर्तेच बाप्पाच विसर्जन करत आहेत. विषेश म्हणजे या उपक्रमात राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता मोहित दळवी याचाही सहभाग आहे. मोहित हा वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसरात राहणारा आहे. बांणगंगेत पडलेल्या एका लहान मुलीचं त्यानं प्राण वाचवले आहेत.

'आई-वडिलांचे छत्र हरवलेला मोहित दळवी वाळकेश्वरला आपल्या आत्याकडे राहतो. २५ एप्रिल २०१५ रोजी मामाकडे सुट्टीत आलेली मुलगी आंगोळीसाठी बाणगंगा तलावात उतरली. या मुलीसोबत तिची मैत्रीणही होती. ही मुलगी तलावात बुडू लागली, मदतीसाठी हाक मारत होती. हे पाहताच विलंब न लावता बाणगंगेत उडी मारला आणि त्या मुलीला वाचवलं', अशी माहिती बिपिन कोकाटे यांनी दिली. 


हेही वाचा -

Ganeshotsav 2020: टिळकांची आठवण करून देणारा अनोखा देखावा

रियाला शवगृहात प्रवेश दिल्याने मुंबई पोलिस आणि कूपर रुग्णालयाला नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या