Advertisement

पायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कोणत्याही दिंड्या निघणार नाहीत,

पायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत
SHARES
Advertisement
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या आषाढी वारीची परंपरा खंडीत होणार आहे. दरवर्षी पंढरपूरात आषाढी निमित्त दाखल होणाऱ्या पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला असून दशमीला पादुका थेट पंढरपूरात पोहचवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

वारीत राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी सहाभागी होतात. लाखोंच्या संख्येने वेगवेगळ्या भागातून वारकरी दिंड्यामधून पंढरपूरला येतात. यामुळे दिंड्यांच्या वाटेवरील गावांच्या अर्थकारणात भर पडते. आळंदी आणि देहू येथून येणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात लाखोने वारकरी येतात. माञ कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा कोणत्याही दिंड्या निघणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 पावसाळी स्थिती नसेल तर हेलिकॉप्टर किंवा विमान आणि पावसाळी परिस्थिती असेल तर एसटीने माउलींच्या पादुका पंढरपुरात आणल्या जातील, तसे नियोजन केले आहे. यंदा कोणत्याही स्थितीत कोणतीही दिंडी निघणार नाही, वारीत ज्या परंपरा चालत आल्या आहेत. ज्यांच्या सेवा होत्या ते आता घरी राहूनच करतील.  याआधीच्या वारीत घरी राहून सेवा केलेल्या आहेत. ज्याच्या सेवा पालखीपुढे होत्या. ते आपल्या घरी राहून करतील अशा सूचना पवारांनी केल्या, त्याला उपस्थितांनी ही पाठिंबा दिला.


त्यामुळे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून यावर्षी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसून दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
संबंधित विषय
Advertisement