रियाला शवगृहात प्रवेश दिल्याने मुंबई पोलिस आणि कूपर रुग्णालयाला नोटीस

सुशांतवर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रिया चक्रवर्तीला शवगृहात प्रवेश देण्यात आला. तिला कोणत्या आधारावर शवगृहात जाण्याची परवानगी तिला देण्यात आली होती?

रियाला शवगृहात प्रवेश दिल्याने मुंबई पोलिस आणि कूपर रुग्णालयाला नोटीस
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआयने  मुंबई पोलिसांभोवती फास आवळण्यास सुरूवात केली आहे. सीबीआयच्या तपासात एका मागोमाग एक समोर येणाऱ्या धक्कादायक खुलाशाने,  मुंबई पोलिसांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात किती गांभीर्याने लक्ष घातले हे दिसून येते. अशातच आता चौकशीत सुशांतला कूपर येथील शवगृहात ठेवले असताना, शवविच्छेदनानंतर रिया चक्रवर्ती सुमारे ४५ मिनिटे कपूर रुग्णालयाच्या शवगृहात उपस्थित होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने कूपर रुग्णालय व मुंबई पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून रिया चक्रवर्तीवर संशय घेतला जात आहे. असे असताना सुशांतवर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रिया चक्रवर्तीला शवगृहात प्रवेश देण्यात आला. तिला कोणत्या आधारावर शवगृहात जाण्याची परवानगी तिला देण्यात आली होती? यावरून आता महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिस आणि कूपर रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.  याबाबतही संपूर्ण माहिती मागविण्यात आली असल्याने हे प्रकरण आता आणखी नवीन वळण घेईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचाः- सामान्य रुग्णांचे महापालिका रुग्णालयांमध्ये हाल

अशातच रिया चक्रवर्ती ही ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने सीबीआयकडे केली आहे. महत्वाचे म्हणजे, यासंबंधित रिया चक्रवर्ती मॅसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार रिया एका ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती, असे दिसून येत आहे. एकीकडे ड्रग्स बाळगणे हा गुन्हा असून सीबीआयने लवकरात लवकर याप्रकरणी कारवाई केली पाहिजे, असे श्वेताने म्हटले आहे. तर, दुसरीकडे रियाने कधीच ड्रग्सचे सेवन केले नाही, असा दावा रियाच्या वकिलांनी केला आहे.

 हेही वाचाः- दादर, माहीममधील टॉवरमधील रहिवाशांसाठी १९९९ रुपयांमध्ये चाचणी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा