सुशांत राजपूत प्रकरण : सीबीआयच्या रडारवर मुंबई पोलिस, तपास अधिकाऱ्यांना समन्स

सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केल्यानंतर या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर सीबीआयने ठिक ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आहे.

सुशांत राजपूत प्रकरण :  सीबीआयच्या रडारवर मुंबई पोलिस, तपास अधिकाऱ्यांना समन्स
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मात्र सुशांतच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप ही गुलदस्त्यात आहे. सीबीआयने या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केल्यानंतर या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर सीबीआयने ठिक ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वांद्रे पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचाः- सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फाँरेन्सिक एक्सपर्ट डाॅ. सुधीर गुप्ता यांनी शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात वेळेचा स्टॅम नाही, तसेच मुंबई पोलिसांना या अहवालाबाबत दुसरे कन्सल्टेशन घेणे आवश्यक असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. तर सुशांतचे शवविच्छेदन १० तासानंतर करण्यात आले. या काळात त्याच्या शरीरात विषारी रसायने आणि विष आढळणे शक्य नाही. कारण ही रसायने किंवा विष केवळ सहा तासचं मृताच्या शरीरात राहू शकतात. असा दावा एका वरिष्ट न्यायवैद्यक अधिकाऱ्याने केला आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

फॉरेन्सिकने वेळेच्या बाबतीत गोळा केलेल्या पुराव्यांबाबत सीबीआयने शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमवर देखील शंका उपस्थित केली आहे. याचबरोबर असा आरोप देखील केला जात आहे की, नियमांनुसार पुरावे आणि गोळा करण्यात आल्या नाही आहेत तसेच त्या सीबीआयकडे देण्यात देखील आल्या नाही आहेत. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार वेळेवर सुशांतचा लॅपटॉप आणि फोन फॉरेन्सिककडे पोहचवण्यात आला नाही. सुशांतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबरोबर छेडछाड करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २४ दिवसांनंतर सुशांतचा फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी देण्यात आला. तर सुशांतचे शवविच्छेदन घाई घाईने उरकल्याचा आरोप करण्यात येत असताना. शवविच्छेदन अहवालावर कोणताही स्टॅम नसल्यामुळे ते कधी करण्यात आले हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे शवविच्छेदन घाई घाईत करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचाः- भयंकर! महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दरम्यान सोमवारी दुपारी सीबीआयचे एक पथक कूपर रुग्णालयात दाखल झाले आणि सुमारे तासाभराने ते पथर रुग्णालयाबाहेर आले. तिथे सीबीआयने सुशांतची अटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमची चौकशी केली. सुशांतच्या पोस्टमार्टमवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या अहवालानुसार, सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्राबाबत सीबीआय टीम समाधानी नाही. सोमवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीची देखील चौकशी केली. चक्रवर्ती परिवारातील रोहित पहिला सदस्य आहे, ज्याची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे सुशा्ंतचा कुक नीरज आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची देखील चौकशी करण्यात येत आहे. याबरोबरच हाऊस हेल्पर केशवची देखील चौकशी केली जात आहे.

हेही वाचाः-कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात तब्‍बल ५७.७६ टक्‍के वाढ

या प्रकरणात वांद्रे पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सीबीआयचा तपास आता अधिकाऱ्यांदिशेने वळला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या पोलिसांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र वांद्रे पोलिस ठाण्यातील१२ ते १३ अधिकारी हे कोरोना संक्रमित असल्याने उपचार घेत आहे. त्यात सुशांत आत्महत्या प्रकरणात तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांचा ही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.    

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा