सुशांत आत्महत्या प्रकरण: कुछ तो गडबड है ! AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा

एम्सचे फाँरेन्सिक एक्सपर्ट डाँ. सुधीर गुप्ता यांनी शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात टाइम स्टँम नाही, तसेच मुंबई पोलिसांना या अहवालाबाबत दुसरे कन्सल्टेशन घेणे आवश्यक असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

सुशांत आत्महत्या प्रकरण: कुछ तो गडबड है !  AIIMS फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फाँरेन्सिक एक्सपर्ट डाॅ. सुधीर गुप्ता यांनी शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालात टाइम स्टॅम नाही, तसेच मुंबई पोलिसांना या अहवालाबाबत दुसरे कन्सल्टेशन घेणे आवश्यक असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. तर सुशांतचे शवविच्छेदन १० तासानंतर करण्यात आले. या काळात त्याच्या शरीरात विषारी रसायने आणि विष आढळणे शक्य नाही. कारण ही रसायने किंवा विष केवळ सहा तासचं  मृताच्या शरीरात राहू शकतात. असा दावा एका वरिष्ट न्यायवैद्यक अधिकाऱ्याने केला आहे.

हेही वाचाः- महाराष्ट्रात ई-पासबाबतचे नियम कायम, गृहमंत्र्यांनी केला खुलासा

फॉरेन्सिकने वेळेच्या बाबतीत गोळा केलेल्या पुराव्यांबाबत सीबीआयने शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमवर देखील शंका उपस्थित केली आहे. याचबरोबर असा आरोप देखील केला जात आहे की, नियमांनुसार पुरावे आणि गोळा करण्यात आल्या नाही आहेत तसेच त्या सीबीआयकडे देण्यात देखील आल्या नाही आहेत. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार वेळेवर सुशांतचा लॅपटॉप आणि फोन फॉरेन्सिककडे पोहचवण्यात आला नाही. सुशांतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबरोबर छेडछाड करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २४ दिवसांनंतर सुशांतचा फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी देण्यात आला. तर सुशांतचे शवविच्छेदन घाई घाईने उरकल्याचा आरोप करण्यात येत असताना. शवविच्छेदन अहवालावर कोणताही स्टॅम नसल्यामुळे ते कधी करण्यात आले हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे शवविच्छेदन घाई घाईत करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचाः- भयंकर! महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दरम्यान सोमवारी दुपारी सीबीआयचे एक पथक कूपर रुग्णालयात दाखल झाले आणि सुमारे तासाभराने ते पथर रुग्णालयाबाहेर आले. तिथे सीबीआयने सुशांतची अटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमची चौकशी केली. सुशांतच्या पोस्टमार्टमवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या अहवालानुसार, सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्राबाबत सीबीआय टीम समाधानी नाही. सोमवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीची देखील चौकशी केली. चक्रवर्ती परिवारातील रोहित पहिला सदस्य आहे, ज्याची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे सुशा्ंतचा कुक नीरज आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची देखील चौकशी करण्यात येत आहे. याबरोबरच हाऊस हेल्पर केशवची देखील चौकशी केली जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा