Advertisement

Ganeshotsav 2020: टिळकांची आठवण करून देणारा अनोखा देखावा

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनांचं सावट असून, साधेपणानं उत्सव साजरा केला जात आहे.

Ganeshotsav 2020: टिळकांची आठवण करून देणारा अनोखा देखावा
SHARES

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनांचं सावट असून, साधेपणानं उत्सव साजरा केला जात आहे. यंदा गणेशोत्सवाकरीता नियमावली आखण्यात आली असल्यानं सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाच्या मूर्तीची उंची कमी केली आहे. अनेक मंडळांनी शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तसंच, सजावटही पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दादर पूर्व येथील राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं प्रथमच शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे.

राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त टिळकांना मानवंदना देणारा देखावा सादर केला आहे. लोकमान्य टिळक यांचा जीवनातील काही निवडक सामाजिक योगदानाची माहिती फोटोंच्या माध्यमाद्यांतून साकारण्यात आली आहे. तसंच Thread-Art चा वापर करून टिळक यांच्या चेहऱ्याचं कलात्मक चित्र बनवविण्यात आलं आहे.

या मंडळामार्फत मागील ५ ते ६ महिन्यांपासून पर्यायवरणस्नेही सजावट करण्यात येत आहे. यंदा कोरोनाचं सावट असल्यानं मंडळानं शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं गर्दीनं करण्याचं आवाहन केल्यानं समुद्रात बाप्पाच्या विसर्जनाला बंदी घालण्यात आली असून, मुंबईत ठिकठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत. मात्र, या मंडळानं इमारतीमध्येच बाप्पाचं विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

'आम्ही आमच्या मूर्तीचं विसर्जन इमारतीतच करणार आहोत. विघटीत मूर्तीचं अमृत जल सर्व रहिवाश्यांना देण्यात येणार असून आपल्या घरातील तुळस व आपल्या घरातील कुंड्याना अर्पण करावा ही विनंती करणार आहोत', असं राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभय अनंत चव्हाण यांनी सांगितलं.



हेही वाचा -

पुरातन शिवमंदिरात अवतरला घरगुती बाप्पा

गणपती विसर्जनासाठी अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक कृत्रिम तलाव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा