गणेशोत्सवासाठी, पालिकेनं वॉर्ड GS मध्ये कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्यावर्षी कृत्रिम तलावांचा आकडा २ च्या घरात होता. आता हा आकडा ९ वर गेला आहे. पालिकेनं यासंदर्भातील माहिती ट्विटरवर दिली. यावर्षी गणेशोत्सवा दरम्यान भाविकांनी समुद्रकनारी गर्दी करू नये यासाठी पालिकेनं कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.
मुंबईत कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पालिकेनं गणशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. प्रशासनानं मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात काही निर्बंध घातले आहेत. गर्दी वाढण्यापासून रोखण्यासाठी पालिकेनं भाविकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घातली आहे. शिवाय, बाप्पाच्या विसर्जनासाठी जवळच्या कृत्रिम तलावाचा वापर करण्यास सांगितलं आहे.
हेही वाचा : नवी मुंबईत गणेश विसर्जनासाठी १३० कृत्रिम तलाव
महानगरपालिकेनं यापूर्वी सांगितलं होतं की, मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी संकलन केंद्र सुरू केली गेली आहेत. या संकलन केंद्रांमध्ये विसर्जनासाठी मूर्ती ठेवता येईल. महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी सहाय्यक आयुक्तांना सर्व विभागांमध्ये विसर्जन मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिवाय, इतर पर्याय देखील प्रशासनानं सुचवलं आहेत. एखाद्याला घराच्या बाहेर पारंपरिक पद्धतीनं मूर्तींचं विसर्जन करायचं असल्यास, मूर्ती थेट पालिकेकडे द्यावी. पालिका त्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करेल. पण कोणत्याही परिस्थितीत भाविकांना समुद्र किनारी जाण्याची परवानगी नसेल. जर वरील पर्याय मान्य नसतील तर विसर्जन घरीच करावं किंवा कृत्रिम तलावांमध्ये करावं, असं प्रशासना तर्फे सुचवण्यात आलं आहे.
हेही वाचा