पालिकेच्या डोर टू डोर मोहिमेला सुरुवात

बृहन्मुंबई महानगरपालिका मंगळवार, १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे.

कोरोनव्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनानं २६ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांची आरोग्य तपासणी हा उपक्रम हाती घेतला आहे. तत्पूर्वी ४ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनीही याची माहिती दिली.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून, सरकार आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि निवडलेल्या प्रतिनिधींच्या मदतीनं राज्यातील २.२५ कोटी कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्याची योजना आखत आहे. शिवाय, लोकांना आरोग्याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न देखील याद्वारे केला जाणार आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली

उपक्रमांतर्गत, रहिवाशांचा ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासण्यात येईल. याशिवाय त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात येईल. कोरोनाव्हायरसची लक्षणे असलेल्या रूग्णांना योग्य उपचार पुरवण्यात येईल. हायरिस्क असलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसंच मधुमेह, लठ्ठपणा, हृदय आणि मूत्रपिंडाचा आजार यासारख्या व्यक्तींना कोरोना झाल्यास तातडीनं उपचार देण्यात येतील.

दरम्यान, महाराष्ट्रात COVID 19 चे १७ हजार ०६६ रुग्ण एका दिवशी आढळले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या भारतात कोरोनाव्हायरसचे ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण आहेत. याव्यतिरिक्त, कोरोनाव्हायरससाठी महाराष्ट्रात सकारात्मकता दर, पुनर्प्राप्ती दर आणि मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे २०.२ टक्के, ७०.१ टक्के आणि २.७७ टक्के आहे.


हेही वाचा

इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचं बीएमसीसमोर आव्हान

नव्वदी पार केलेल्या २ रूग्णांची कोरोनावर मात

पुढील बातमी
इतर बातम्या