Advertisement

ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली

ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलं होतं. मात्र, गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली
SHARES

ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलं होतं. मात्र, गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ठाणे जिल्ह्यात रोज १७०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.  

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत ठाणे जिल्ह्यात १२ हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण होती. मात्र, आता ही संख्या १७ हजारांच्या वर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्ह्यात रोज १ हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळत होते. रुग्ण बरे होँण्याचं प्रमाणही अधिक होतं. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजारांपर्यंत खाली आली होती.

गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत आणि ग्रामीण भागांमध्ये रोज सरासरी १ हजार ७०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या रविवार सायंकाळपर्यंत १ लाख ४८ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात १७ ७८५ सक्रिय रुग्ण आहेत. 


शहर                        सक्रिय रुग्ण     

                     ५ सप्टेंबर           १३ सप्टेंबर

कल्याण-डोंबिवली    ३६४२                     ५२६९

नवी मुंबई            ३६६६                     ३५१७

ठाणे शहर            २३८५                      ३४६५

ठाणे ग्रामीण          १५५६                      २१३०

मीरा-भाईंदर           १७३५                      १९३९

उल्हासनगर            ४६३                       ५११

बदलापूर               ३८५                       ३८०

अंबरनाथ               ३२५                       ३५२

भिवंडी                  १५२                       २२१Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा