Advertisement

इमारतींमधील कोरोना संसर्ग रोखण्याचं बीएमसीसमोर आव्हान

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र, ही वाढ झोपडपट्ट्या, चाळींपेक्षा मोठ्या सोसायटी आणि इमारतींमध्ये अधिक असल्याचं समोर आलं आहे.

इमारतींमधील कोरोना संसर्ग रोखण्याचं बीएमसीसमोर आव्हान
SHARES

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र, ही वाढ झोपडपट्ट्या, चाळींपेक्षा मोठ्या सोसायटी आणि इमारतींमध्ये अधिक असल्याचं समोर आलं आहे. मागील १२ दिवसांमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे इमारतींमधील वाढता कोरोनाचा फैलाव रोखण्याचं आव्हान मुंबई महापालिकेसमोर उभं राहिलं आहे. 

१ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत इमारतीमधील कंटेन्मेंट झोनची संख्या २३३४ वरून वाढून ८६३७ वर पोहोचली आहे. झोपडपट्ट्या-चाळींमध्ये मात्र कंटेन्मेंट झोन संख्या २० ने कमी होऊन ५५७ वर आली आहे. त्यामुळे मोठ्या सोसायट्या आणि इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे.

मागील महिन्यापासून मुंबईतील कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश आलं होतं. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे.  मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मागील दहा दिवसात ८४ वरुन ५८ दिवसांवर आला आहे. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी ८० ते १००  दिवसांवर होता. ३१ ऑगस्टला तो ८४ दिवस इतका होता. मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर १.२० टक्के झाला आहे.  मुंबईत रोज २ हजार पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत.





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा