Advertisement

धारावीत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

मागील दोन महिन्यापासून धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र, आता धारावीत पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

धारावीत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
SHARES

मागील दोन महिन्यापासून धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र, आता धारावीत पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी या ठिकाणी २३ नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील पाच दिवसात धारावीत ९९ नवे रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

धारावीतील एकूण रुग्णसंख्या २९३८ झाली आहे. यामधील २५१२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या धारावीत १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील दोन महिन्यापासून धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यात मुंबई महापालिका प्रशासनाला यश आलं होतं. धारावीत रोज दहाच्या आतच रुग्ण सापडत होते. मात्र, मागील पाच दिवसात धारावीती दहापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. रविवारी १३ सप्टेंबरला धारावीत १४ रुग्ण, १२ सप्टेंबरला १८, ११ सप्टेंबरला ३३ आणि १० सप्टेंबरला ११ रुग्ण सापडले आहेत.

धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, नागरिकांकडून काळजी घेतली जात नाही. अनेक जण मास्कही वापरताना दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.



हेही वाचा -

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र

बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा