Advertisement

नव्वदी पार केलेल्या २ रूग्णांची कोरोनावर मात

कोरोनाची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृद्धांचा आकडा अधिक आहे. मात्र, मुंबईतील ९० पेक्षा अधिक वय असलेल्या दोन वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे.

नव्वदी पार केलेल्या २ रूग्णांची कोरोनावर मात
SHARES

कोरोनाची लागण होऊन मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृद्धांचा आकडा अधिक आहे. मात्र, मुंबईतील ९० पेक्षा अधिक वय असलेल्या दोन वृद्धांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले घनश्यामदास चंचलानी (९२) आणि माधुरी संपत (९१) हे कोरोनातून बरे झाले आहेत.

पनवेलमध्ये राहणारे घनश्यामदास चंचलानी यांना अचानक ताप येऊ लागला होता. औषधोपचारानेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांची स्वॅब टेस्ट आणि रक्तचाचणी करण्यात आली. यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून झाले. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. 

 माधुरी संपत यांनाही कोरोनाची लागण झाली. हाडांना फ्रॅक्चर झाल्याने त्या सहा महिन्यांपासून अंथरूणात होत्या. परंतु, अचानक ताप, अंगदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना वोक्हार्ट रुग्णालयात हलवण्यात आले.  लघवीत इंफेक्शन असल्याचंही समोर आलं. उपचारानंतर त्यांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. वोक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टेंट फिजिशियन आणि डायरेक्टर इंटरनल मेडिसिन डॉ. बेहराम पारडीवाला यांच्या देखरेखीखाली या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू होते.

 डॉ. बेहराम पारडीवाला यांनी याबाबत सांगितलं की,  रूग्णालयात आणलं तेव्हा दोन्ही रुग्णांना खूप ताप होता. कुटुंबियांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात चंचलानी यांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यालाही रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोघांवर औषधोपचार सुरू करण्यात आले. आम्ही दिवसातून तीन वेळी त्यांची ऑक्सिजन पातळी तपासत होतो. १२ दिवसांनंतर त्याची सामान्य ऑक्सिजन पातळी ९८ इतकी होती. दोघांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानं त्याला घरी सोडण्यात आलं. त्यानंतर घरी त्यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं होतं. 







Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा