सिडकोचा दिवाळी धमाका, 20 भुखंडांची विक्री!

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

सरकारी कर्मचारी आणि पोलिस मोठ्या संख्येने निवासस्थानात राहत असून या निवासस्थानांची दुरवस्था सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात सरकारी कर्मचारी असो वा पोलिस, मुंबई वा आसपासच्या परिरसरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यात पत्रकारांची अवस्था तर अत्यंत बिकट. त्यामुळे सरकारी कर्मचारी, पोलिस, कलाकार, पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहत आहे.

आता मात्र अनेक सरकारी कर्मचारी, पोलिस, कलाकार, लोकप्रतिनिधी, खेळाडू, आरक्षित गट (एससी-एसटी, व्हीजी-एनटी-नवबौद्ध), स्वातंत्र्य सैनिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण, सिडकोने नवी मुंबई परिसरातील तब्बल 20 भूखंड विक्रीसाठी काढले असून या भुखंडांची खरेदी विविध गटातील लोकांना सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून करता येणार आहे. त्यानुसार गुरूवारी, 5 ऑक्टोबरपासून या भूखंड विक्रीच्या माहिती पुस्तिकेच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. तर 9 ऑक्टोबरपासून अर्जविक्रीस सुरूवात होणार असल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सिडकोकडून पहिल्यांदाच अशी भूखंड विक्री होत असून लवकरच मुंबईप्रमाणे नवी मुंबईत पत्रकार कॉलनी, साहित्य सहवास, कलानगर अशी नावे दिसली, तर आश्चर्य वाटायला नको.

ठिकाण सेक्टर

प्लॉट क्र.

क्षेत्रफळ (चौ. मी.)

बेस किंमती

अनामत रक्कम

गट

पनवेल 5 ए (ई)

47

1142.00

37,454

42, 87,700

स्वातंत्र्य सैनिक

नेरूळ  58 ए  

11

3890.00

43,890

1,70,73,300

सरकारी कर्मचारी-प्रथम श्रेणी

नेरूळ  40

39-40

1342.00

39,900

53, 54,600

सरकारी कर्मचारी-द्वितिय श्रेणी

खारघर 20

29

1475.00

27,960

41, 24,100

सरकारी कर्मचारी-तृतीय श्रेणी

पनवेल 13 (ई)

24

2105.00

25,830

54,37,300

सरकारी कर्मचारी-चतुर्थ श्रेणी

पनवेल 5 ए (ई)

6

1200.00

25,830

30, 99,600

केंद्र सरकारी कर्मचारी

पनवेल 8 (ई)

12,126,127

1008.00

25,830

26,03,700

अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती

कळंबोली 11

6बी-1

1499.00

24,582

36,84,900

व्हीजी, एनटी, नवबौद्ध

पनवेल 8 (डब्ल्यू)

13

2468.00

25,830

63,74,900

पत्रकार-कलाकार

नेरूळ  38

12

938.00

39,900

37,42,700

खेळाडू

खारघर 12

6

2200.00

27,960

61,51,200

लोकप्रतिनिधी

कळंबोली 6 ई

8

1000.00

19,665

19,66,500

खुला प्रवर्ग

कळंबोली 6 ई

9

954.00

19,665

18,76,100

खुला प्रवर्ग

कळंबोली 11

6 बी

1150.11

19,665

22,61,700

खुला प्रवर्ग

खारघर 20

34

1475.00

27,960

41,24,100

खुला प्रवर्ग

खारघर 19

257 ते 260

1544.00

27,960

43,17,100

खुला प्रवर्ग

पनवेल 8 (ई)

112,118,124,117,124

1808.00

32,288

58,38,200

खुला प्रवर्ग

सानपाडा 24

37सी-37 डी

940.00

48,488

45,57,900

खुला प्रवर्ग

सानपाडा 24

35ए-35बी

800

48,488

38,79,100

खुला प्रवर्ग

घनसोली 6

62

2165.00

23,670

51,24,600

सरकारसाठी आरक्षित

इथे मिळेल माहिती पुस्तिका

5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर - सकाळी 11 ते दुपारी 1

मार्केटिंग मॅनेजर - 1चे कार्यालय, सिडको, तिसरा माळा, रायगड भवन, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई - 400614

अर्जविक्री

9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर - सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5

हे भूखंड निवासी बांधकामासाठी आरक्षित असून सरकारी कर्मचारी, पोलिस, पत्रकार, कलाकार, खेडाळू आणि इतर आरक्षित गटातील लोकांनी एकत्र येत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करत या भूखंडांवर घरे बांधणे अपेक्षित आहे. दरम्यान, ज्याप्रमाणे अर्ज येतील, त्याप्रमाणे अर्जांची छाननी करत सिडकोकडून पात्र अर्ज दाखल करून घेतले जातील. तर एकापेक्षा अधिक पात्र अर्ज असल्यास लॉटरी पद्धतीने भुखंडांची विक्री होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

अखेर म्हाडाच्या लॉटरीतील दलाली आणि भ्रष्टाचाराला लगाम!

पुढील बातमी
इतर बातम्या