Advertisement

म्हाडाच्या कोट्यवधींच्या घरांसाठी शेकडो अर्ज


म्हाडाच्या कोट्यवधींच्या घरांसाठी शेकडो अर्ज
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 10 नोव्हेंबरला फुटणाऱ्या लॉटरीच्या ऑनलाइन अर्जविक्री- स्वीकृतीला इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळी यंदाच्या लॉटरीतील सर्वांचे डोळे पांढरे करणाऱ्या महागड्या, कोट्यवधींच्या घरांसाठी अर्जदारांनी मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. 'मुंबई लाइव्ह'ला मिळालेल्या माहितीनुसार, कोट्यवधींची किंमत असलेल्या 204 घरांसाठी आतापर्यंत 487 अर्ज दाखल झाले आहेत.

एकूण 819 घरांसाठी सध्या म्हाडाचे मुंबई मंडळ अर्ज स्विकारत आहे. त्यानुसार गेल्या 11 दिवसांत 24 हजार 500 जणांनी नोंदणी केली आहे. तर, गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17 हजार 536 अर्ज भरले आहेत.


घरं कोट्यवधींची, अर्ज शेकड्यांनी

दरम्यान, 819 घरांपैकी लोअर परळ येथील 2 घरांची किंमत प्रत्येकी 1 कोटी 95 लाख अशी आहे. तर येथीलच 34 घरांची किंमत प्रत्येकी 1 कोटी 42 लाख अशी आहे. पवाईतील 168 घरांची किंमत प्रत्येकी 1 कोटी 40 लाख इतकी आहे. म्हणजेच 819 पैकी 204 घरे ही एक कोटीच्या पुढची आहेत.

म्हाडाच्या घरांच्या किंमतींनी सर्वांनाच धक्का दिला आहे. तर या घरांना प्रतिसाद मिळणार नाही, ही घरे उच्च वर्गालाही परवडणार नाहीत, अशी जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्षात मात्र या घरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.


1 कोटी 95 लाखाच्या 2 घरांसाठी 41 अर्ज

म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळ मधील 1 कोटी 95 लाखाच्या 2 घरांसाठी आतापर्यंत 41 अर्ज आले आहेत. तर 1 कोटी 42 लाखाच्या 34 घरांसाठी 111 अर्ज आले आहेत. त्याचवेळी पवई, तुंगातील 1 कोटी 40 लाखाच्या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या 168 घरांसाठी 335 अर्ज आले आहेत.

मुंबई मंडळाने या प्रतिसादावर समाधान व्यक्त केले आहे. तर हा प्रतिसाद असाच वाढेल असा दावाही केला आहे.



हेही वाचा

म्हाडा लाॅटरी : 7900 जणांची नोंदणी, तर 3131 अर्ज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा