Advertisement

शासकीय वसाहतीतील रहिवाशांची गृहप्रतिक्षा संपेना


शासकीय वसाहतीतील रहिवाशांची गृहप्रतिक्षा संपेना
SHARES

मुंबई - वांद्रयातील शासकीय वसाहतीतले पाच हजार शासकीय कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासांतर्गत माफक दरात घर मिळावं यासाठी 2007 पासून लढा देत आहेत. नऊ वर्षे झाली तरी त्यांची ही गृहप्रतिक्षा काही संपलेली नाही. सरकारी उदासीनतेमुळं हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकारत नसल्याचं म्हणत आता या शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार बुधवारी, 14 डिसेंबरला सकाळी 10 वाजता वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती नियोजित शासकीय वसाहत गृहनिर्माण संघीय संस्थेचे प्रमुख सल्लागार मधुकर विचारे यांनी दिली आहे.

अंदाजे 99 एकरवर वसलेल्या शासकीय वसाहतीतील इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या असून रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. असं असताना पुनर्विकास मात्र काही मार्गी लावण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड नारजी आहे.

संबंधित विषय
Advertisement