धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित लवकरच आपल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधुरीचा पहिला मराठी चित्रपट बकेट लिस्टचं पोस्टर याआधीच लाँच करण्यात आलं होतं. नुकताच या चित्रपटाचा टीझर सर्वांसमोर आला आहे. माधुरीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे.
तब्बल २३ वर्षांनंतर माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे 'बकेट लिस्ट'मधून एकत्र येणार आहेत. या चित्रपटात रेणुका शहाणेचीही महत्त्वाची भूमिका आहे. या टीझरमध्ये मात्र रेणुका शहाणे दिसत नाही. याआधी माधुरी आणि रेणुका यांनी 'हम आपके है कौन' या सिनेमात बहिणींची भूमिका साकारली होती. या दोघा बहिणींच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
स्वत:च्या आयुष्यातलं वेगळेपण शोधणाऱ्या एका सामान्य स्त्रीचा हा चित्रपट आहे. मधुरा साने असं माधुरीच्या भूमिकेचं नाव आहे. जी पत्नी, आई, गृहिणी आहे. जी स्वत:ची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. 'बकेट लिस्ट...माझी, तुमची...आपल्या सगळ्यांची' अशी या चित्रपटाची आकर्षक टॅगलाईन आहे! तेजस देओस्कर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा